*🚩श्रीविठ्ठलाचे मूर्तीविज्ञान🚩*
🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
*‼जपुन ठेवावी अशी मौलीक माहिती‼पांडुरंग व नरहरीसोनार*
🔔🏵🔔🏵🔔🏵🔔🏵🔔
*१.‘भक्त पुंडलिकाने दिलेली वीट, नरहरी सोनारांचा कटोरा व त्यांच्या साठी धारण केलेले शिवलिंग*

🚩👉🏿वीट हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. पृथ्वीतत्त्वापासून संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत चांगल्या प्रकारे घातली गेली आहे.


*२.पांडुरंग*

🚩👉🏿योगमार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्त्वाचे प्रतीक समजला जातो. सगुण रूपाला ‘श्री विठ्ठल’, तर निर्गुण रूपाला ‘पांडुरंग’ असे म्हटले जाते. हिमालयात अधिकांश शिवलिंगे पांढर्‍या रंगाची आहेत. त्यामुळे पांडुरंग हाच महादेव आणि विठ्ठल आहे.


*३. मुक्तकेशी दासी*

🚩👉🏿मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायांत रुतली आहेत. बोटाची तशी खूण श्री विठ्ठलाच्या चरणावर आहे. श्री विठ्ठलाच्या चरणांशी मुक्ती मिळते; परंतु पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आहे. त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ‘भक्ती करूनच मुक्ती मिळते’, असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे.


*४. श्री विठ्ठलाचे समचरण*

🚩👉🏿श्री विठ्ठलाला सर्व समान आहे. कुणी लहान नाही, मोठा नाही. पांडुरंग हा समानतेचे प्रतीक आहे.


*५. श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे*

🚩👉🏿मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गानेे जायचे, ते ठरवून घ्यावे. वाममार्गाला जात आहोत कि चांगल्या मार्गाने, हे पहावे. ‘चांगल्या मार्गाने जातांनासुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये. त्यामुळे चांगल्या मार्गाने जातांनाही काही बंधने पाळणे आवश्यक आहे’, असे हे तोडे सांगतात. शिवाय तोडे असेही सांगतात की, चांगले-वाईट काही न मानता साक्षित्वाने रहा.


*६. श्री विठ्ठलाच्या दोन्ही पायांतील काठी*

गुरे सैरावैरा धावत असतांना गुराखी काठीच्या साहाय्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. तसे आपले षड्रिपू मधे मधे उधळत असतात. त्यांना साधनारूपी काठीने नियंत्रित ठेवायचे असते. संयमाने रहायचे असते. त्याचे प्रतीक ही काठी आहेे.


*७. श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा*

🚩👉🏿देवाचे पितांबर सोन्याचे असते. ध्यानमार्गामध्ये तेजाचे प्रतीक म्हणून नील वर्ण, पांढरा रंग आणि शेवटी सुवर्णाचा रंग असे सांगितले आहे. त्या सुवर्णतेजाचे प्रतीक म्हणजे श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा आहे.

*८. कमरेचा वासरीवेलाचा करगोटा (करदोडा)*

🚩👉🏿वासना, पंचेंद्रिये,देवाने स्वतःच्या कमरेला बांधले आहे.करगोटा (करदोडा)हा दागिना नरहरी सोनार यांनी बनवला. देव कंबर कसून सर्व गोेष्टींसाठी सिद्ध आहे. तसेच मानवानेहीकरायचेआहे.याबरोबरच संत शिरोमणी नरहरी सोनार यांना चारी मुक्ती पैकी शेवटची म्हणजे सायुज्यता मुक्ती पांडुरंगाने दिली, म्हणजेच सदेह श्री नरहरी सोनार पांडुरंगाच्या कमरेवरील कटदोऱ्यात विलीन झाले.तेथेच नरहरींचे भक्तांना दर्शन होते.

*९. अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा*

🚩👉🏿स्त्री आणि पुरुष एकच आहेत. स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे, याचे प्रतीक ही जागा आहे.


*१०. श्रीवत्सलांच्छन*

🚩👉🏿भृगुऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारल्याची ही खूण आहे. देवाने ऋषींची लाथ छातीवर झेलली. या ठिकाणी देवाने कुठलाही अहंकार बाळगला नाही. त्रागा न करता संयमाने ती खूण देव छातीवर मिरवत आहे. यातून देव आपल्याला राग आणि अहं घालवायला सांगत आहे. रागावर नियंत्रण मिळवावे, हे श्री विठ्ठल यातून आपल्याला सांगत आहे.


*११. उजव्या हातातील कमळाची पाकळी*

🚩👉🏿हे शांतीचे प्रतीक आहे.


*१२. कानातील मकराकार कुंडले*

ही कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यानसाधनेद्वारे आपण नवद्वारांपैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो. कान बंद करणे, हे केवळ निर्विकल्प समाधीमध्येच शक्य असते. मत्स्य हे आपतत्त्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्त्वावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायूतत्त्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायूतत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे; म्हणजे कान बंद करणे सुलभ होते, हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात.


*१३. श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार*

🚩👉🏿भ्रूमध्याच्या वर चिदाकाश आहे. या चिदाकाशातील शुद्ध जाणिवेलाच आपण परमात्मा म्हणतो. हे महादेवाचे निर्गुण तत्त्व आहे.तसेच संतशिरोमणी नरहरी सोनार यांच्या मनातील हरिहर भेद मिटावा व हरिहराचे एकत्र दर्शन नरहरींना व्हावे करीता, पांडुरंगाने शिवलिंग डोक्यावर धारण केले.

🚩👉🏿श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आरंभ होतो, तो वीटेपासून म्हणजे देवाच्या सगुण रूपापासून आणि शेवट होतो, तो महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या दर्शनात. साधनेत ‘सोहम्, सोहम्’ सांगितले जाते किंवा ‘हंसोहम्’ असे म्हटले जाते. ‘सोहम्, सोहम्’ म्हणतांना आपला श्‍वास स्थिरावतो आणि हंस होतो. त्यानंतर तो चिदाकाशात जातो. या चिदाकाशातील जी अहंविरहीत पूर्ण शुद्ध जाणीव आहे, ती म्हणजे ‘सोहम्’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि ।’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, ही जाणीव.’

(‘श्रीक्षेत्र पंढरपूरचा महिमा आणि श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान या प्रकल्पातील ध्वनी ऐकून संकलित केलेली महत्त्वाची सूत्रे)
🚩👉🏿पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण

‘तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असते किंवा शक्तीपीठ असते; परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्‍वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे. ‘पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग (मिलाफ) आहे’.
संकलन संतोष शहाणे लेखक तथा संपादक हरितारण नरहरी सोनार अभंग गाथा. परभणी. मो. 9890091411
वाचा व पुढे पाठवा सेवा नरहरींची सेवा पांडुरंगाची.
*🙏‼रामकृष्णहरी‼🙏*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने