शेअर मार्केट शिका मराठी मधून

 

1.    स्टॉक मार्केटची ओळख  What is Share Market in Marathi

स्टॉक मार्केट हे स्टॉक किंवा शेअर्सचे विक्रेते आणि खरेदीदारांचे ठिकाण आहे ,जिथे स्टॉक खरेदी करून अथवा विकून एखाद्या व्यवसायावर मालकी दाखवली जाते— या मध्ये वेगवेगळ्या कंपनीस कार्यरत आहेत त्याना शेअर बाजार एक्सचेंजेस (NSE, BSE, DOW JONES आणि NASDAQ, इ.) असे म्हणतात. कंपन्या त्यांच्या स्टॉकची यादी  initial public offering किंवा IPO द्वारे स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट  करतात आणि गुंतवणूकदार ते काही भाग  खरेदी करतात.

गुंतवणूकदार काही प्रमाणात कंपनी मध्ये भागीदार होतात . 

आणि तो पैसे ( गुतंवणूकदाराचा )  कंपनीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो .

 गुंतवणूकदार नंतर हे शेअर्स खरेदी आणि विक्री करतात तर एक्सचेंज प्रत्येक लिस्टिंग वर  स्टॉकची मागणी आणि पुरवठ्याचा रिपोर्ट  ठेवते. खरेदीदार "Bid " ऑफर करतात, म्हणजे ते एखाद्या स्टॉक ची सर्वोच्च रक्कम द्यायला तयार असतात . जी  सहसा विक्री  रकमेपेक्षा कमी असते, त्याला   "ask " प्राइस असे म्हणतात

या फरकाला बिड-आस्क स्प्रेड म्हणतात.

गुतंवणूकदार  किती खरेदी किंवा विक्री करण्यास इच्छुक आहेत हे पाहण्यासाठी कॉम्पुटर च्या साह्याने विशिष्ट प्रोग्रॅम च्या मदतीने मार्केट वर  लक्ष ठेवले जाते .

अश्या पद्धतीने एखाद्या कंपनीचे स्टॉक मार्केट मध्ये लिस्टिंग होते, गुतंवणूकदारांच्या गुंतवणुकी वरून कंपनी मार्केट मधून पैसे उभा करते,

आता त्या स्टॉक मध्ये ट्रेडर्स ट्रेंड करतात किंवा गुंतवणूक करतात, जर ती कंपनी चांगलं व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये होणारे प्रॉफिट  गुतंवणूकदारां मध्ये वाटून दिले जाते, हे सर्व कॉप्युटराज्ड असल्यामुळे स्टॉक मार्केट संपूर्ण प्रोसेस वर लक्ष ठेवून असते.

स्टॉक मार्केट मधून पैसे कमवायचा पद्धती

या मध्ये आपण  प्रकारे पैसे कमवू शकतो .

A.    गुंतवणूक ( Long term and Short term  )

B.     इंट्रा डे ट्रेडिंग ( intra day treading )

A ) गुंतवणूक Invesment  ( Long term and Short term )

    A. शॉर्ट टर्म ( Short term/ Swing trading  )  या मध्ये या मध्ये तुम्ही  एखाद्या कंपनी चे शेअर काही  दिवसांसाठी ( १० ते १५ जास्तीत जास्त महिना )  खरेदी करून ठेवता त्याला शॉर्ट टर्म  इन्वेस्टींग असे म्हणतात. किंवा त्याला स्विंग ट्रेडिंग ( Swing treading) असे देखील म्हणतात . या मध्ये काही % मध्ये प्रॉफिट झाले कि लगेच ते शेअर विकून प्रॉफिट बुक केले जाते.

कंपनी बद्दल येणाऱ्या news अपडेट पाहणे गरजेचे असते

रिस्क चे प्रमाण कमी तसेच प्रॉफिट चे प्रमाण देखील कमी आहे

गुंतवणुकी साठी जास्त रक्कम (भांडवल) गरजेची असते.

 

    Bलॉन्ग टर्म  या मध्ये तुम्ही  एखाद्या कंपनी चे शेअर काही वर्षा  करता ( ते अथवा त्याहून जास्त कालावधी साठी ) खरेदी करून ठेवता त्याला लॉन्ग टर्म इन्वेस्टींग असे म्हणतात.

या मध्ये तुम्हला कंपनी कडून दार वर्षी डिव्हिडंट सुद्धा दिला जातो.

गुंतवणुकी साठी जास्त रक्कम गरजेची असते .

कंपनी चे फंडामेंटल अनालिसिस करणे गरजेचे असते

या मध्ये लॉस होण्याची शक्यता कमी असते , पण त्याच प्रमाणे प्रॉफिट पण कमी असते

जर चांगले स्टॉक आणि गुंतवणूक भांडवल  जास्त असेल तर सर्वात सेफ असा ऑप्शन लॉन्ग टर्म इन्वेस्म्र्न्ट हा आहे. 

B.   इंट्रा डे ट्रेडिंग ( intra day treading )

सकाळी मार्केट ओपन झाल्यावर स्टॉक खरेदी करून दुपारी बंद होण्या आधी जर स्टॉक विकला तर  अश्या ट्रेडिंग  ला इंट्रा डे ट्रेडिंग  म्हणतात.

या मध्ये कंपनी च्या स्टॉक ची टेक्निकल अनालिसिस करणे गरजेचे असते , त्याच बरोबर न्यूज वरती पण हे ट्रेडिंग डिपेंड असते

या मध्ये भरपूर प्रॉफिट तितकाच लॉस होनाची शक्यता असते

अश्या ट्रेडिंग साठी मार्केट चा चांगला अभ्यास असणे गरजेचे आहे

हे ट्रेडिंग करण्या साठी टेक्निकल अनालिसिस महत्वाचे आहे त्यात , चार्ट पॅटर्न, कँडलस्ट्रीक पॅटर्न, इंडिकेटर्स असे भरपूर प्रकार असतात.

मार्केट मधील सर्वात रिस्की ट्रेडिंग पद्धत आहे

अशा प्रकारे आपल्याला शेअर मार्केट बद्दल खूप काही मराठी मधून शिकणार आहो . 



3 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा