देशासाठी जगायचं रं ।
देशासाठी जगायचं रं||

शिवबानं सांगावा धाडलाय रं।

वेळपडली तर मरायचं रं धर्मासाठी झुंजायचं रं ।। ध्रु ।।

देवाधर्माची आन हाय, बेईमानकोणी होयाचं नाय

आपलं ईमान सोडायचं नाय येकादिलानं नांदायचं रं देशासाठीं जगायचं रं ।।१।।

तोरणां घेऊन राजानं, तोरण बांधलंराज्याचं आई
भवानीच्या पुण्याईचं,

सोराज्य होया मर्दानुरं देशासाठीं जगायचं रं ।।२।।

शिवाजीराजा नं केलं रं काय?

खानाचं प्वाट फाडलं रं मामाची बोट छाटली रं,

देवीला बोकडाचा निवदं रं देशासाठीं जगायचं रं ।।३।।

देवी नवसाला पावली रं, रामाचं राज्य आलं रं

रावणाची मस्ती जिरली रं, शिवबाचंराज्य आलं रं

देशासाठीं जगायचं रं ।।४।।

॥जय भवानी॥
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!

4 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने