कॉलेज चे पहिले लेक्चर न्
पहिल्या बाकावर बसलेलो मी . . !
पैजण चा आवाज करीत उशिरा
येणारी न् माझ्या बाजूला बसलेली ती . . !
तिला इग्नोर करून
बोर्ड कडे लक्ष देणारा मी . . !
पण तिच्या मोहित करणाऱ्या
सुगंधाने मला मोहित करणारी ती . . !
नकळत पणे मित्राच्या दिशेने
नजर फिरवून तिच्या कडे लपून पाहणारा मी . . !
अन् डोळ्यांचे खेळ खेळून डोळ्यावरचे केस
सावरून तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहणारी ती . . !
तिच्या सोबत दोन मोलाचे
शब्द बोलण्या साठी धडपड करणारा मी . . !
अन् मला पाहून लाजून
गोड खळी चेहरयावर आणणारी ती . . !
हिम्मत बांधून तिला प्रपोज करणारा मी . . !
अन् विचार करून
तुला उत्तर देईन असे बोलणारी ती . . !
एक एक मिनिट तसा प्रमाणे अनुभवणारा मी . . !
अन् मिनिटांचे तासात
रूपांतर करून माझा स्वीकार करणारी ती . . !
माझ्या हृदयाचा दरवाजा तिच्या साठी उघडा करणारा मी . . !
अन् तिच्या नाजूक हृदयामध्ये मला सामावून घेणारी ती . . !
एका सुंदर आयुष्याला सामोरा जाणारा मी . . !
माझ्या कोमल अश्या आयुष्याला आशा देणारी ती . . !
प्रेमाचे फुल फुलवून प्रेमात आनंद घेणारा मी . . !
त्या नाजूक फुलांच्या पाकळ्या बनून माझ्यात समावणारी ती . . !
तिच्या सोबत आयुष्याचे
पाठ लिहून लग्नाचे स्वप्न पाहणारा मी . . !
आयुष्य फार थोडे असते हे मनात लपवणारी ती . . !
माझ्या हृदयात तिला नेहमी जपून ठेवणारा मी. . !
प्रेम कसे असते असे धाखवून देणारी ती . . !

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने