मराठी भाषा दिवस (अन्य नावे: जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन;मराठी भाषा गौरव दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीलापाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.[१]भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो।जय मराठी
हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढ दिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात ,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी. मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा💐💐


