ति माझ्याशी बोलायची
रोज गोड़ हसायची
मी रागात असतांना
स्वतःशीच मात्र रुसायाची...

तिच्या रोजच्या गमती
मला रोज संगायची
मी त्यावर हसलो नाही तर
लटकेच फुगुन बसायची...

मी लिहलेली नवी कविता
रोज pageवर वाचायची...
वाचल्यावर मात्र शांतपणे
माझ्या कड़े पहायची...

एकदा म्हणाली ति ...
तू माझ्यावर का कविता करत नाहीस ???
तेव्हा कळलं मला
माझी एकही कविता तिला अजुनही कळाली नाही..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने