या आजीचं नव्हे तर पणजीचं नाव आहे *"सालूमरादा थिमाक्का"*.
वय १०६ वर्ष पूर्ण.
अपत्य संख्या १,००,००० हून जास्त आणि ती ही ठणठणीत सुस्थितीत.
अपत्य संख्या वाचून दचकलात का...?

पद्म पुरस्कार वितरणात एका १०६ वर्षाच्या पणजीला पद्मश्रीने सन्मानित करून खरंतर भारत सरकारने त्या पुरस्काराचा मान वाढवला आहे.

एका निरक्षर घरात, निरक्षर म्हणून जन्माला येऊन, मोलमजुरी करून दिवस काढणाऱ्या आणि आजच्या पद्मपुरस्कार वितरण्यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या डोक्यावर मायेने हात फिरविणारा या मातेचं कर्तृत्व अफाट आहे.

लग्नानंतर मुलं नाही म्हणून चक्क घराजवळील हायवेवरील ४ किलोमीटर पट्यात या माऊलींन आपल्या नवऱ्या सोबत ३८५ हुन जास्त वडाची झाडं लावून त्यांची आपल्या पोटच्या पोरांसारखी काळजी घेतली.
आज तो ४ किलोमीटरचा पट्टा आजूबाजूच्या रणरणत्या उन्हातसुध्या डौलात येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देतो आहे. गेल्या ७०-८० वर्षात या माउलीने १ लाखाहून जास्त झाडं लावून ती जगवली आहेत.

बदलत्या जागतिक हवामानाकडे (Climate Change) जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी चळवळ उभी करणारी अवघ्या १६ वर्षाची ग्रेटा थनबर्ग आणि गेली ८० वर्ष सतत वृक्षारोपण करून नवीन ecosystem जन्माला घालणारी *थिमक्का* माऊली आपल्या कृतीतून हेच सांगतात की, "वय हा फक्त एक आकडा आहे".
आयुष्य किती जगता यापेक्षा ते कसं जगता, समाजात रास्त बदल घडवून आणण्यासाठी त्या आयुष्याचा उपयोग करता का यांतच खरं तर भरून पावण्यासारखं आहे.


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने