*धरण पाणी आवक जावक मापक बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?*
.
*1) "TMC" टी.एम.सी. म्हणजे काय ?*
*2) "Cusec" क्युसेक म्हणजे काय ?*
*3) "Cumec"  म्हणजे काय ?*....
*उत्तर*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
.
सध्या सर्वदूर चांगला तर अनेक ठिकाणी  मुसळधार पाऊस होतो आहे,त्यामुळे काही धरणं संपूर्णतः भरून ओसंडून वाहत आहेत.(ओव्हर फ्लो) तर काही धरणं भरत आहेत, त्यामुळेच ओसंडून वाहणार्या धरणां मधुन मोठ्या प्रमाणावर  पाणी सोडल्या जात आहे. म्हणजेच फार मोठ्या प्रमाणावर धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
.
इतके TMC टी.एम.सी. पाणी जमा झाले, तितके CUSEC क्युसेक पाणी सोडले वगैरे आपण नेहेमीच वृत्तपत्रां मधून वाचत आहोत.तसेच अनेक विविध टी.व्ही. चॅनेलस् द्वारे विविध धरणं ओव्हर फ्लो झाल्याबाबत बातम्यांचे द्वारे विविध दृश्ये पहातो व ऐकतो.तसेच विविध सोशल नेटवर्किंगस् द्वारे महत्वपूर्ण माहितीचे आदान - प्रदान करतो.
.
*परंतु विविध धरणांतील पाणीसाठ्या बाबत ज्या संज्ञा व मोजणीसाठी जी विविध आंतरराष्ट्रीय  एकके - परिमाणे वापरली जातात त्यांचा
नेमका अर्थ काय?*
*हे समजून घेता यावे या एकमेव उद्देशाने सदरचा उपयुक्त माहितीपूर्ण लेख आम्हां धोपावकर बंधु-भगिनी आणि परिवार, अहमदनगर तर्फे आमच्या सर्व सुर्हुद; हितचिंतक; मार्गदर्शक; दोस्त-भाई-रिश्तेदार यांचे करिता सप्रेम भेंट सविनय सादर.....*
.
आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) *01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.*

*01 tmc = 28,316,846,592 litres*

२) *01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.*

३) *01 Cumec = 01 cubic meters per second = 1000 litres per second.*

उदाहरणार्थ ::-
*पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
.
याच धरणातून सध्या  ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे 👇
१)उजनी ११७.२७ tmc.
२) *कोयना १०५.२७
tmc
३) *नाथसागर डॅम,(पैठण) जायकवाडी ७६.६५ tmc*
४)*पेंच तोतलाडोह डॅम ३५.९० tmc*
५)*पूर्णा येलदरी डॅम २८.५६ tmc*
.
* सोप्या भाषेत,एक टीएमसी म्हणजे 1000 फूट लांब,1000 फूट रुंद आणि 1000 फूट उंच टाकीमध्ये जेवढे पाणी मावेल तेवढे परिमाण ! 1000 फूट उंच टाकी व्यवहारात असू शकत नाही.10 फूट उंच असू शकते. अशी 10 फूट उंच आणि 10,000 फूट लांब व रुंद टाकिमध्येही एक टीएमसी पाणी मावते !
.
*व्यावहारिक जगात नेहेमीच लागणारी काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची एकके परिमाणे आणि संज्ञा रुपांतरे पुढीलप्रमाणे*;
.
*१ हेक्टर = १०००० चौरस मीटर.*
*१ एकर = ४० गुंठे*
*१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौरस फुट*
*१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे*
*१ आर = १ गुंठा*
*१ हेक्टर = १०० आर*
*१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौरस फुट*
*१ चौरस मीटर =१०.७६ चौरस फुट*
*(धोपावकर बंधु-भगिनी आणि परिवार, अहमदनगर यांचे कडील संकलित वैविध्यपूर्ण माहितीच्या बहुमोल खजिन्यातील अनमोल मोत्यांच्या मालिकेमधुन)*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने