विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखीं 

अग्निशिखा त्या शांत जाहल्या, शांत जाहला ज्वालामुखी
विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखीं ।। धृ ।।
श्राप लाभला फितुरीचा, पुसली गेली सारी नाती
कोल्ह्याकुत्र्यांच्या हाती गवसले, मराठीयांचे छत्रपती
छळ जाहला चाळीस दिवस तो तेज तयांचे कधी न ढळले शरीराच्या त्या करेकपातून थेंब थेंब रक्तांचे गळ
धर्म राखला शान राखली मान राखली धर्माची अखेरच्या त्या क्षणापर्यंत न सोडिली वाट कर्माची
मृत्यूही नतमस्तक झाला, झुकला राजे तुम्हपुढे
अमावस्या मृत्युंजय झाली, फाल्गुनीची तो फिका पडे
औरंग्याची घमेंड जिरली तख्त त्यागले भयामुळे बलिदान तुमचे सार्थ जाहले मुजरा राजे तुम्हपुढे
महाराष्ट्र सारा पोरका झाला शोककळा सर्वामुखी विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखी ।।





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने