मराठा म्हणावे अशा वाघराला 

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।

आपत्तीतही पाय मागे फिरे ना

महासागरी धैर्य ज्याचे गळे ना

मिळवितो रणी म्लेंच्छसेना धुळीला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।


कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती

रणी झेलतो सिंहसा छातीवरती

हकारूनी आव्हानतो जो यमाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।


जरी शत्रूकांता प्रसंगी दिसेल

तिला साडीचोळी निशी पाठविल

कधी स्वप्नी न पाप स्पर्शे मनाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४।।


महावादळांच्या विरोधात ठाके

पुढे संकटांच्या कधीही न वाके

पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५।।

धरू खडगधारा वधू शत्रू पूर्ण

करू म्लेंच्छसत्ता बळाने विदीर्ण

क्षुधा तहान ऐसी ज्याच्या उराला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६।।


विना शस्त्र सिंहासवे झुंजणारा

मुखातील जिव्हा बळे तोडणारा

अलंकार ज्याचे करी खडग् भाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।७।।


मनी धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा

उरी देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा

सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।८।।


मऊ मेणवत बोलण्या वागण्यात

परी फोडतो वज्र ही तत् क्षणात

गवसणी धजे घालण्याला नभाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।९।।


नसे किर्तीकांक्षी , धनाचा न दास

उरी पेटतो हिंदवीराज्य ध्यास

विसरतो क्षणी देशकार्यी स्वतःला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१०।।


सहस्रावधी शत्रू दिसता समोर

तरीही खचे ना उरातील धीर

उफाळूनी धावे अरी मारण्याला

मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।११।।


असे मांड घोड्यावरी नित्य घट्ट

पवनपुत्रसा गाठतो शत्रू थेट

रणी अर्पितो म्लेंच्छसेना धुळीला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।


असे देह तगडा चिवट ताठ बळकट

उभट रुंद छाती ग्रीवा घट्ट मनगट

फडामाजी कुस्ती करे तत्क्षणाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।


वसे धैर्यलक्ष्मी अखंडित चित्ती

करे झुंजूनी शत्रूसेना समाप्ती

भिती स्पर्शते ना कधी अंतराला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।


सदा संतचरणी त्वरे ठेवी माथा

वधे देवद्रोही स्वये म्लेंच्छकुत्ता

करे द्वंद्व आव्हान जो म्लेंच्छतेला

मराठा म्हणावे अशा वाघराला।। १५।।


खडे सैन्य घेई अटकपार जाई

जिथे म्लेंच्छ भेटे तिथे सूड घेई

सदा धाव ज्याची असे उत्तरेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१६।।


महा साहसेची महा धैर्यतेची

महा कर्तृत्वाची महा शूरतेची

त्वरे देणगी मागतो जो हरीला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१७।।


सुधांशूस पाहता उफाळे समुद्र

अफजल्यास पाहता शिवरायरक्त

पाहताच संतापतो पाकड्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१८।।

झुके ना कधी संकटांच्या समोर

रणी खंडते ना कधी खडगधार

हरीची कृपा मानितो संकटाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१९।।


करे भगव्या झेंड्यासवे पूर्ण वारी

तसा म्लेंछनाशार्थ करणार स्वारी

उभयतां मध्ये भेद वाटे न ज्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२०।।


रणी धाव घेता असे खडगहस्त

विठू वारीसाठी असे टाळ हस्त

अलंकार दोन्ही करी टाळ भाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२१।।


फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभुंना

तसा चित्ती ध्यातो शिवा काशीदांना

सदा सिद्ध त्रयीवत् तनू झोकण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२२।।

रणी धर्म रक्षावया झुंजणारा

टिचुनी स्वये शत्रूंना मारणारा

म्हणे धर्म रक्षावया जन्म झाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२३।।


नदी सागराच्या कडे धाव घेई

सुगंधाकडे भृंग ही झेप घेई

तसा धावतो शत्रू निर्दाळण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२४।।


धनाच्या रुपाच्याहूनी मानी शील

खलाच्या पुढे ना कधी ही झुकेल

त्यजे स्वाभिमानार्थ ही जीवनाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२५।।


भरारी गरुडाची बुद्धी कृतीत

अभयता वनेंद्राची ही अंतरात

असे राजहंसवत कृती बोलण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२६।।


दमे ना थके ना झुके ना हटे ना

कधी हिंदवी राज्यमार्गी ढळे ना

निराशा न स्पर्शे कधीही उराला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२७।।


विषाच्याहूनी ही कडू जो अमाप

तसा अमृताच्याहूनी गोड खूप

सहोदरचि शोभे नभी भास्कराला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२८।।


विपत्तीतही चित्त ज्याचे ढळे ना

रणी झुंजता पाठ मागे वळे ना

भवानी पदी पूर्णतः वाहिलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२९।।


मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके

स्वधर्मास्तावे जो सहज देह त्यागे

उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३०।।


जगी रंजले गांजले कोणी प्राणी

निवारी तयांची त्वरे दुःख खाणी

कुणाच्याही दुःखावरी घाली घाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३१।।


म्हणे बाप माझा असे पंढरीत

आई राहते नित्य तुळजापुरात

तयां दर्शनासाठी आतुरलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३२।।


कुणी निंदती देश धर्मास दुष्ट

अशांना झटे पूर्ण करण्यास नष्ट

असे आर्तता धर्मसंस्थापण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३३।।

जरी व्याघ्रसा सिंहसा देहभाव

परी अंतरी आर्तसा भक्तिभाव

सदा देश धर्मार्थ आसुसलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३४।।


मनी जागृती स्वप्नी ही राष्ट्रचिंता

झटे निर्मिण्या हिंदवीराज्य सत्ता

शिवाजी आकांक्षांस्तवे जन्म झाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३५।।


स्मरे श्वास घेता जिजाऊसुताला

उरी आठवितो सईच्या सुताला

समजतो तृणासारिखे जो जिण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३६।।


असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त

तसा शारदापुत्रवत जो प्रबुद्ध

पदी मारुतीवत असे जो गतीला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३७।।


उताराकडे वाहते नित्य पाणी

विकाराकडे धावती सर्व प्राणी

नसे तोड ज्याच्या जगी संघर्षाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३८।।


सुखासीनतेचा असे हाडवैरी

अथक कर्मयोगात घेई भरारी

रवी जान्हवीच्या कुळी जन्मलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३९।।


रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले

कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले

तदर्थी धरी बंदूक खडग भाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४०।।


क्लिबांचीअहिंसा तसे ब्रम्हचर्य

स्वधर्मा स्वदेशास्तवे नष्टचर्य

लाथाडतो थुंकतो गांधीतेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४१ ।।


कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर

त्वरे मारतो पोट फाडूनी ठार

शिवाजी जसे फाडती अफजल्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४२।।


आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला

मुलाचे त्यजून धाव घेई गडाला

स्वतःच्याहूनी मायभू श्रेष्ठ ज्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४३।।


भले शत्रूची माय कांता बहीण

तिला मानतो जन्मतः माय बहीण

अशी धर्मश्रद्धा उरी बाणलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४४।।


असे सर्वसाक्षी पुऱ्या संस्कृतीचा

खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा

न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४५।।


शिके गर्भावासात झुंजाररीत

लगीन खडगसंगे पडे उदरात

वधाया सदा सिद्ध म्लेंच्छासुराला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४६।।


नभी ज्या क्षणी होतसे गडगडाट

वनी तत्क्षणी डरकाळे सिंहनाद

तसा डरकाळून मारितो दुश्मनाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४७।।


स्वधर्मावरी करता कोणी आघात

तसा मायभूला करे कोणी घात

भिडे आग पायातली मस्तकाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४८।।


लगीन रायबाच्या आधी कोंढाण्याचे

कराया गडी प्राण देतो स्वतःचे

नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला

मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।४९।।


शिवा काशीदांचा असामान्य त्याग

मला ही असा लाभूदे कर्मयोग

असे मागतो नित्य तुळजपदाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५०।।


जगावे शिवाजी सुटावे जिवंत

स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत

शिवा काशीदांच्या धरे जो पथाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५१।।


निखाऱ्यातूनी हासत चालणारा

विना ढाल शत्रूसवे झुंजणारा

भितो मृत्यू ही स्पर्श करण्या जयाला

मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५२।।


तृषा भागवितो पिऊनी तृषेला

क्षुधा भक्षुनी संपवितो क्षुधेला

तिन्ही ईषणाही पराभूत केला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५३।।


कृती उक्तीमाजी असे एकरूप

वचनपूर्ततेच्या विना घे न झोप

जगी धर्म मानी वचन पाळण्याला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५४।।


जसा कर्मयोगी तसा ज्ञानवंत

जरी भक्तियोगी मनाने ज्वलंत

जिणे मायभूमीपदी अर्पिलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५५।।


पुरा ठार मारावया शाहिस्त्याला

घुसुनी लालमहाली करे खड्गहल्ला

भीती स्वप्नी ना स्पर्शते काळजाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५६।।


स्वयंस्फूर्त उत्साही जो धैर्यशील

मनाने नभासारखा ही विशाल

कृती उक्तीने पाळतो सत्यतेला

मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५७।।


घणाघात घालू मुघलतख्त फोडू

पुरे जाळुनी राख पाताळी गाडू

अटकपार दौडण्यास आसुसलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५८।।


मनी खदखदे म्लेंच्छ संताप चिड

आतुर घ्यावया शत्रूचा पूर्ण सूड

सदा म्लेंच्छनाशार्थ आसुसलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५९।।


नसे शत्रूसुडाहूनी श्रेष्ठ धर्म

घडे धर्मरक्षण जरी जाण मर्म

रणी देश रक्षण्यासही वाहिलेला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६०।।


सुखाच्या स्तवे जो न लाचार श्वान

उरी धमणी ठोक्यास्तवे राष्ट्रध्यान

सदा चित्ती ध्यातो वढू रायगडाला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६१।।


वसे रोमरोमी स्वधर्माभिमान

चले श्वास श्वास शिवबासमान

जिणे अर्पिले पूर्णतः मायभूला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६२।।


कुणी वीट मारे दगड हेच उत्तर

दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर

स्वये होई वणवा गिळाया आगीला

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६३।




हे देखील  वाचा भारतीय जीडीपी बद्दल 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने